
Mumbai Suburban Kotwal Recruitment मुंबई – मुंबई उपनगर यांच्या मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोतवाल भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता 4थी पास असून उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
या जाहीरनाम्याद्वारे जाहीर करण्यात येते की वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाच्या तरतूदींच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांच्या अधिपत्याखालील तहसिलदार अंधेरी, बोरीवली, कुर्ला यांच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून या जाहीरनाम्याद्वारे दिनांक ०५/०७/२०२३ पासून ते दि. १७/०७/२०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज प्रक्रिया बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती खालील प्रमाणे आम्ही आपल्याला देत आहोत.
Mumbai Suburban Kotwal Recruitment
Mumbai Suburban Kotwal Recruitment येथे आम्ही मुंबई उपनगरीय कोतवाल भरती 2023 ची संपूर्ण माहिती देत आहोत. पदांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान, अनुभव तपशील, पदांसाठी अर्ज कसा करायचा, पदांसाठी कुठे अर्ज करायचा, शेवटची तारीख, महत्त्वाची लिंक इ., उमेदवार पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण तपशील पहा.
आम्ही आमच्या वेबसाइट टेलीग्राम चॅनेलवर दररोज बातम्यांच्या नोकऱ्यांच्या तपशीलांची जाहिरात करतो. तर ताज्या अपडेट्ससाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा.
Mumbai Suburban Kotwal Recruitment Educational Qualification
४ थी उत्तीर्ण
Age Limit
अर्जदाराचे वय अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांका रोजी १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – मुंबई उपनगर
पगार – 15000/-
Fee
अर्जाचे शुल्क रु. २०/- १०.२ परीक्षा शुल्क (रुपये)
अ) खुला प्रवर्ग ७००/-
ब) मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग- रु. ५००/-
Important Dates Mumbai Suburban Kotwal Recruitment
सदर पदासाठी करावयाचा अर्जाचा नमुना दि. ०५/०७/२०२३ पासून ते दि. १७/०७/२०२३ या कालावधीमध्ये पाठवावा .
Mumbai Suburban Kotwal Recruitment Exam Pattern
सदर भरतीकरीता लेखी परीक्षा ही १०० गुणांची असेल.
लेखी परीक्षा ही दि. ०६/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. तसेच कोणत्याही आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगीत ठेवावी लागल्यास पुढील परीक्षेची वेळ, ठिकाण व दिनांक उमेदवारास त्याने अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक, ईमेलद्वारे कळविण्यात येईल. अशा वेळी प्रथम परीक्षेचे प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
लेखी परीक्षा ही ५० प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची बहुपर्यायी असेल.
सदर परीक्षेसाठी खालील नमूद विषयांवर प्रश्नपत्रिका असेल- सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी, मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व नागरीकशास्त्र, भुगोल व मुंबई उपनगर जिल्हयातील संबंधीत प्रश्न:
परीक्षेचे माध्यम मराठी राहील.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- तहसीलदार अंधेरी पत्ता- डी. एन. रोड, भवन्स कॉलेज जवळ, अंधेरी (प.) मुंबई ४०००५८
- तहसीलदार बोरीवली पत्ता- नाटकवाला लेन, डॉ. न. रा. करोडे मार्ग. एस. व्ही. रोड, बोरीवली (प.), मुंबई- ४०००९२
- तहसीलदार कुर्ला पत्ता- टोपीवाला इमारत, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.
Notification (जाहिरात) – येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट) – येथे क्लिक करा
Also Read – National Agri Food Biotechnology Institute Recruitment Apply Online