Join our Telegram

Maharashtra Talathi Bharti 2023: Talathi Bharti Update जाणून घ्या

Maharashtra Talathi Bharti update
Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 : तलाठी भरती 2023 बद्दल एक अद्ययावत माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासन लवकरच तलाठी भरतीची (Maharashtra Talathi Bharti 2023) अधिसूचना जाहीर करणार आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 15 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची ऑनलाईन अर्ज लिंक सुरु होण्याची अपेक्षा आहे. दिनांक 03 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 चा ड्राफ्ट जाहीर झाला होता.

या लेखात आपण तलाठी भरती 2023 च्या या अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत खालील दिलेली माहिती आपण संपुर्ण वाचा.

Maharashtra Talathi Bharti Latest Update 2023

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यातील तलाठी या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर महसूल विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4644पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra Talathi Bharti update

पुण्यासह नाशिक, नागपूर,औरंगाबाद, कोकण तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे.

येत्या 15 जूनपर्यंत ही लिंक खुली होईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव याचे दिनांक 12 जून 2023 चे पत्र जाहीर करण्यात आले आहे. ज्यात एकूण रिक्त पदांच्या 20 टक्के जागा या अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023 – या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.

Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment